पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात घरफोड्या (Burglary) सुरूच असून आज पुन्हा आंबेगाव पठार येथे भरदिवसा म्हणजे दोन तासासाठी घराला कुलूप लावून गेलेल्या एका फळ विक्रेत्याचे घर चोरट्यानी फोडत 10 लाख रुपयांचा ऐवज चोरला (looted Rs 10 lakh) आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरणं आहे.
याप्रकरणी किरण गायकवाड (वय 52) यांनी भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth police) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आंबेगाव पठार येथील स्वामिनागर भागात राहतात.
त्यांचा फळ विक्रीचा गाडा आहे.
भारती हॉस्पिटल परिसरात हे दुकान आहे.
काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते गेले होते.
यावेळी चोरटयांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला.
त्यानंतर बेडरुमध्ये घुसत कपाटातून दागिने आणि रोकड असा एकूण 9 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
ते परत 5 वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे आढळून आले.
यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी येथे धाव घेत पाहणी केली.
आता पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
सीसीटिव्ही नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र शहरात एकूणच घरफोड्यांचा (Burglary) सुरू असणारा धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नसून, त्यामुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण आहेत.
कृपया हे देखील वाचा:
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू
धक्कादायक ! झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ
Digital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय? ती कशी जनरेट केली जातेय?, जाणून घ्या प्रोसेस
सरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या कुणाला मिळणार प्राथमिकता?
Nitin Raut | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का ?