पुणे : बहुजननामा ऑनलाइन – टेम्पाे कंटेनरवर आदळून अपघात ( tempo container accident ) झाल्याची घटना पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडली आहे. रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. टेम्पोतील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला.
भरत मोहन जगदाळे, वय ३१ असे मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. त्यांची पत्नी राजश्री भरत जगदाळे, मुलगी ऋतिका भरत जगदाळे, चुलत भाऊ धनराज सुखपंत जगदाळे असी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघाताची नोंद रसायनी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा लातूरहून पार्सल साहित्याने भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला. रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ टेम्पो(क्रमांक एम एच-२४,एयु-५८३१) पहाटेच्या सुमारास आला. यावेळी अचानक टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने टेम्पो समोरील कंटेनर वर उजव्या बाजूने धडकला.
कृपया हे देखील वाचा:
धक्कादायक ! झोपेत असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या; सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ
Digital Signature | डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय? ती कशी जनरेट केली जातेय?, जाणून घ्या प्रोसेस
सरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील गॅप केला कमी, जाणून घ्या कुणाला मिळणार प्राथमिकता?
Nitin Raut | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का ?
Pune Crime News | कोथरूडच्या परमहंसनगरमध्ये 23 वर्षीय महिलेच्या गळयातील 50 हजाराचे दागिने हिसकावले