पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात घरफोड्या सुरूच असून, कात्रज येथील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी साडे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे (Burglary in Katraj, Pune). जंगजंग पछाडून देखील पोलिसांना हे चोरटे गुंगारा देत आहेत. त्यामुळे मात्र पुणेकर हवालदिल झाले आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी किरण शेटे (वय 60) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कात्रज येथे मोरे बाग येथील कांचननगरी सोसायटी ए. विंग येथे राहत आहेत. दरम्यान ते शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच त्यांच्या घरातून 1 लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असा 4 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. फिर्यादी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
Web Title : burglary in pune burglary in katraj area of pune theft of four and a half lakh
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली