पुणे न्यूज (Pune News) :बहुजननामा ऑनलाइन – lohegaon forest park road | लोहगाव येथील फॉरेस्ट रस्त्यावर (lohegaon forest park road) मध्यरात्री झोमॅटो डिलव्हरी बॉयला (Zomato delivery boy) तिघांनी अडवून चाकूने मानेवर वार करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Pune Crime News | In the Lohgaon area, a Zomato delivery boy was stabbed
याप्रकरणी कमलेश पांडे (वय 32,रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्या(Airport Police Thane)त तक्रार दिली आहे.
त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोहगाव (Lohegaon) येथे वडगाव शिंदे वस्ती (Wadgaon Shinde) येथे राहतात. ते झोमॅटो डिलव्हरी बॉय म्हणून नोकरी देखील करतात.
दरम्यान शनिवारी रात्री ते पार्सल ऑर्डर देऊन परत फिरेस्ट रोडने घरी जात असताना एअर फोर्सच्या भिंती जवळील फॉरेस्ट पार्क येथे दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्याला अडविले.
तसेच मानेवर चाकूने वार करत 20 हजार रुपयांची दुचाकी जबरदस्तीने चोरून नगर रोडने पळ काढला आहे. तिघे पसार झाल्यानंतर फिर्यादी यांनी विमानतळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
त्यानी तातडीने या गुन्हेगारांचा माग काढण्यास सुरुवात केली.
पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास उपनिरीक्षक कापुरे हे करत आहेत.
web title:Pune Crime News | In the Lohgaon area, a Zomato delivery boy was stabbed.
Pune Crime News Ramwadi Area | पुण्याच्या रामवाडी परिसरात वाहने अडवुन चालकांना मारहाण; दोघांना अटक
Pune Police News | पुणे पोलिस दलातील 28 वर्षीय महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ
IPS Officers Transfer | 11 अधिकार्यांच्या बढत्यासह सुमारे 50 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या होणार?