Bullock Cart Race in Pune | बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन; पुणे पोलिसांकडून 12 जणांवर FIR
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली असतानाही बैलगाडा शर्यत पुण्यात (Bullock Cart Race in Pune) आयोजित करण्यात आली होती. बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race in Pune) आयोजित करुन तिला प्रतिबंध करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या 12 जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयोजकांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.17) सकाळी दहा वाजता कात्रज जवळच्या गुजरवाडी (gujarwadi-katraj) येथे घडली
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संतोष अशोक ननवरे (वय-46 रा. गोकुळनगर, कोंढवा), योगेश बाळासाहेब रेणुसे (वय-29 रा. नेरावणे, वेल्हे), मयूर दिलीप शेवाळे (वय-26 रा. देवाची उरुळी, शेवाळेवाडी), हरिश्चंद्र भागा फडके (वय-52), पद्माकर रामदास फडके (वय-37), पंढरी जगन फडके (वय-55 तिघेही रा. विहीगर, नरे, पनवेल), ऋषिकेश चंद्रकांत कांचन (वय-23 रा. उरुळी कांचन), संकेत शशिकांत चोरगे (वय-21) यश राजु भिंगारे (वय-19), संतोष शिवराम कुडले (वय-41 तिघेही रा. भेलकेवाडी, भोर), राहुल प्रकाश चौधरी (वय-34 रा. वारजे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालय (High Court) व राज्य शासनाने (State Government) बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली असतानाही पंढरीनाथ फडके यांनी एकाच्या मदतीने गुजरवाडी येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या सपाट मैदानात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले. लोकांना जमवले. बाबरमळा येथे बैलांना गाड्यांना जोडून, त्यांना निर्दयीपणे मारहाण करुन त्यांच्या शेपट्या पिरगाळून त्यांना जबरदस्तीने आरडा ओरडा करत पळवून निर्दयतेने वागवले.
त्यावेळी पोलीस आयोजक व सहभागी होणाऱ्या इतरांना बालगाडा शर्यत बेकायदा असल्याचे सांगत होते. तरी त्यांनी फिर्यादी पोलिसांशी वाद विवाद करुन त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला. त्यानंतर शर्यतीत एक बैल व एक छकडा पळवून लावला. कोरोना संबंधी नियमांचे उल्लंघन केले. पुढील तपास पोलीस करित आहेत.
Web Titel :- bullock cart race in pune organizing bullock cart races despite the ban fir against 12 persons by pune police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Crime | पैसे देण्यास नकार दिल्याने सत्तूरने 32 वार, तरुण गंभीर जखमी
Comments are closed.