बुलढाणा : बहुजननामा ऑनलाईन – Buldhana Crime News | बुलढाणा जिल्ह्यात एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा शेंदुर्जन येथून जवळच असलेल्या आंबेवाडी फाट्याजवळ हा भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Buldhana Crime News)
काय घडले नेमके?
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा शेंदुर्जन येथून जवळच असलेल्या आंबेवाडी फाट्याजवळ एका भरधाव टिप्परने बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात बाइकवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी नीलकंठ मार्तंड खोडके (वय वर्ष 34, राहणार शेंदुर्जन) यांनी साखरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमोल शिवाजी खोडके (वय 22 वर्ष) आणि ओंकार गेबीनाथ खोडके (वय 19 वर्ष) राहणार शेंदुर्जन तालुका सिनखेडराजा अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हि घटना घडली तेव्हा हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच 21 बीसी 0833 या बाईकने आंबेवाडी फाट्याजवळून जात होते. यावेळी भरधाव टिप्पर क्रमांक एम एच 28 बीबी 1299 ने दुचाकीस्वार अमोल शिवाजी खोडके व ओंकार गेबीनाथ खोडके यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमोल खोडके हा जागीच ठार झाला, तर ओंकार खोडके हा गंभीर जखमी झाला. यानंतर जखमी ओंकारला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच साखरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर पळून गेलेला टिप्परचालक साखरखेडा पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोकळे हे करीत आहेत. या घटनेमुळे शेंदुर्जन गावावर शोककाळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Buldhana Crime News | today buldhana truck hits bike takes life of two
हे देखील वाचा :
Thane Crime News | जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या; ठाण्यातील घटना