ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – Thane Crime News | ठाण्यातील अंबरनाथ या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जन्मदात्या बापानेच आपल्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील स्वामीनगर या ठिकाणी हि घटना घडली आहे. आपल्या पोटच्या मुलाची हत्या (Murder) करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्नात असताना तेथील स्थानिक नागरिकांनी त्याला बघितले. यानंतर नागरिकांनी आरोपी बापाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आनंदकुमार गणेश असे आरोपी बापाचे नाव आहे. (Thane Crime News)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी आनंदकुमार गणेश हा अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरात राहातो. तो त्या ठिकाणी गटार आणि चेंबर साफ करण्याचं काम करतो. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे कुटुंब पत्नी, मुलगा आणि मुलगी त्याच्यापासून वेगळे राहत होते. मुलगा आकाश हा रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. आरोपी बापाने बुधवारी रात्री डीएमसी कंपनी परिसरात आपल्या मुलाची गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर तो त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देण्याच्या तयारीत होता मात्र ही घटना स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी आनंदकुमार याला दारूचं व्यसन होतं. त्याला दारूसाठी सतत पैसे लागत होते. यामुळे तो वारंवार कुटुंबाकडे पैशांची मागणी करत होता. यामुळे या सगळ्या त्रालासा कंटाळून त्याची पत्नी आपला मुलगा आकाश आणि मुलीसोबत स्वतंत्र राहत होते. ते भाजीविक्री करून आपला कुटुंबाचा उदनिर्वाह करत होते. मात्र मुलगा आणि पत्नी आपल्यापासून दूर राहातात याचा राग मनात असल्यामुळे आरोपी बापाने आपला मुलगा आकाश याची गळा चिरून हत्या केली. अंबरनाथ पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Thane Crime News | father murdered son in thane accused arrested
हे देखील वाचा :
Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न