नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बसप) बॅंक बॅलेन्सच्या बाबतीत इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकले आहे. बसपने निवडणूक आयोगाकडे २५ फेब्रुवारी रोजी आपल्या एकूण खर्चाची माहिती दिली असून यानुसार राजधानी दिल्लीतील सरकारी बॅंकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ६६९ कोटी रुपये डिपॉजिट आहेत.तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या समाजवादी पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ४७१ कोटी रुपये आहेतबसप २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपले खातेही खोलू शकली नव्हती सध्या बसपने दिलेल्या माहितीनुसार आपल्या हातात सध्या ९५. ९४ लाख इतकी रोख रक्कम असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या स्थानावर समाजवादी पक्ष असून पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ४७१ कोटी रुपये आहेत.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट ११ कोटींनी कमी झाला.या यादीत कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. कॉंग्रेसकडे १९६ कोटींचा बॅंक बॅलेन्स आहे. मात्र ही माहिती गतवर्षी २ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीच्या आधार देण्यात आली आहे. कॉंग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आपल्या बॅंक बॅलेन्सची माहिती अपडेट केलेली नाही.मात्र, भाजप या यादीत प्रादेशिक पक्षांच्याही मागे पडली आहे. भाजप टीडीपीनंतर पाचव्या स्थानावर आहे. भाजपकडे ८२ कोटींचा बॅंक बॅलेन्स, तर टीडीपीजवळ १०७ कोटींचा आहे. भाजपचा दावा आहे की, २०१७-१८ मध्ये मिळालेल्या १०२७ कोटींपैकी ७५८ कोटी खर्च करण्यात आले. कोणत्याही पक्षाकडून खर्च करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.