बहुजननामा ऑनलाइन टीम –
बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीनं 1499 रुपयांचा नवीन प्रीपेड आणला आहे. याची वैधता 1 वर्षाची आहे. यात ग्राहकांना डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. बीएसएनएल चेन्नईच्या ट्विटर अकाऊंटवरून कंपनीनं या प्लॅनची घोषणा केली आहे. PV 1499 असं या प्लॅनचं नाव आहे. 1 सप्टेंबर 2020 पासून ग्राहकांसाठी हा प्लॅन उपलब्ध असणार आहे.
किती मिळणार डेटा ? कसं असणार कॉलिंग ?
बीएसएनएलच्या ग्राहकांना या प्लॅनमध्ये तब्बल 14 जीबी एवढा डेटा दिला जाणार आहे. सर्व नेटवर्कसाठी यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. याशिवाय रोज 100 एसएमएस दिले जात आहेत. याची खासियत अशी आहे की, प्रमोशनल ऑफरअंतर्गत सुरुवातीला 30 दिवसांची अतिरीक्त वैधता मिळणार आहे. यानुसार ग्राहकांना 365 दिसवांऐवजी 395 दिवस वैधता दिली जात आहे.
कसा अॅक्टीवेट कराल हा प्लॅन ?
हा प्लॅन अॅक्टीवेट करण्यासाठी तुम्ही बीएसएनएलच्या वेबसाईटवर जाऊ शकता. याशिवाय तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 123 नंबरवर PLAN BSNL1499 एसएमएस करू शकता.
एका वर्षाचा आणखी एक प्लॅन
कंपनी ग्राहकांना 365 दिवसांचा आणखी एक प्लॅन ऑफर करत आहे. ज्यात सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग असेल आणि रोज 2 जीबी डेटा मिळेल. याशिवाय रोज 100 एसएमएस फ्री मिळतील. यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा दिली केवळ सुरुवातीच्या 60 दिवसांसाठी मिळते. यानंतर ग्राहकांना व्हाऊचर्सचा वापर करावा लागतो.