बहुजननामा ऑनलाइन टीम – टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना कमी पैशात जास्त सेवा देण्यासाठी स्पर्धा लागली असून, आता भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) देखील यासाठी सज्ज झाली आहे. १ डिसेंबर पासून BSNL तीन नवीन पोस्टपेड प्लॅन्स बाजारात आणणार आहे. त्याची किंमत १९९ रुपये, ७९८ रुपये आणि ९९९ रुपये आहे. या तिन्ही प्लॅन्सची टक्कर थेट रिलायन्स जिओच्या फायबर पोस्टपेड सोबत होईल. हे नवीन प्लॅन्स बाजारात आल्यावर कंपनी ९९ रुपये, २२५ रुपये आणि ३२५ रुपये, ७९९ रुपये आणि ११२५ रुपयांचे जुने प्लॅन्स बंद करणार असल्याची माहिती मिळत आहे.
बीएसएनलचा १९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
कंपनीच्या सुरुवातीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना २५ जीबी डेटा आणि ७५ जीबी डेटा पर्यंत रोलओवरची सुविधा मिळेल. BSNL च्या नेटवर्कवर कॉलिंग अनलिमिटेड राहणार असून, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३०० मिनिट्स दिले जातील. तसेच १०० एसएमएस देखील मिळणार आहेत.
बीएसएनलचा ७९८ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग तसेच ५० जीबी डेटा प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. कंपनी या प्लॅनमध्ये १५० जीबी पर्यंत डेटा रोलओवर सुविधा आणि १०० एसएमएस प्रति दिन देणार आहे. या प्लॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अँड व कनेक्शनची सुविधा देण्यात येईल. त्यात प्रायमरी कनेक्शनप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग, ५० जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतील.
बीएसएनलचा ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
BSNL चा हा सर्वात महागडा प्लॅन असून त्यामध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. ग्राहकांना ७५ जीबी डेटा आणि २२५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर सुविधा मिळेल. तसेच ३ फॅमिली अँड ऑन कनेक्शनची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.