लातूर : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारिप बहुजन महासंघ व सह्याद्री युवा मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या रक्तदान शिबिरात १८७ जणांनी रक्तदान केले. यात महिलांचाही सहभाग होता.
शिबिराचे उद्घाटन माजी सभापती माधव कोळगावे यांनी केले. अध्यक्षस्थानी संजय कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अरुणा संगेवार, एम. बी. वाघमारे, श्रीकांत बनसोडे, दत्तू कांबळे, प्रा. अनिल कांबळे, सय्यद साजीद, सिद्धार्थ सूर्यवंशी, सुनील दहिकांबळे, धर्मपाल गायकवाड, एम. एन. क्षीरसागर, मेघराज गायकवाड, सचिनभाई वाघमारे, सावन कदम, पघन झांबरे, प्रा. सत्यपाल वाघमारे, विनोद नामपल्ले, या कार्यक्रमाचे आयोजन भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष मनोज कांबळे उपस्थित होते.
शिबिरासाठी विशाल तांदळे, लखन गायकवाड, रामेश्वर गवाले, धर्मपाल परातवाघ, प्रवीण कासादे, बालाजी कसादे, आदित्य गुळवे, शंकर गडमे, दयानंद वाघमारे, इमरान शेख, समाधान गायकवाड, शिवा गडमे, कुंदन हरगिले, आझम शेक, अभिजित गायकवाड, गोविंद कदम, सचिन ढाकणे, पप्पू आंदोरीकर, असित बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.