बहुजननामा ऑनलाईन टीम – एका रिसॉर्ट टाउनमध्ये सुट्टीचा आनंद घेत असलेल्या 22 वर्षीय मुलीने तिच्यावर समुद्रकिनाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ब्रिटीश मुलीने सांगितले की, फ्रेंच नागरिकाने तिच्यावर बलात्कार केला. 8 ऑगस्ट रोजी ही घटना स्पेनमधील मजोरका बेटवरील महालुफ शहरामध्ये घडली आहे. हल्लेखोरांनी तिला धमकी दिली होती की, तुला समुद्रात बुडवून मारेल. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली फ्रेंच पर्यटकांना अटक केले आहे. एका वृत्ताने दिलेल्या माहितीनूसार, फ्रेंच पर्यटकांनी घटनेचा व्हिडीओ बनवून स्नॅपचॅटवरही पोस्ट केला होता. परंतु नंतर तिने पोलिस चौकशीत दावा केला की, कोणताही व्हिडिओ बनलेला नाही आणि मुलीच्या सहमतीने संबंध झाले होते.
आरोपी व्यक्ती आणि मुलगी एकाच ४ स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. असे म्हटले जात आहे की, यापूर्वी दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. त्याचवेळी मेजरका बेट वृत्तपत्राच्या माहितीनूसार, बुधवारी रात्री एकत्र घालवल्यानंतर या जोडप्यांमध्ये सहमतीने संबध झाले होते.
डेली मेलच्या वृत्तानुसार, तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ही मुलगी एका फ्रेंच व्यक्तीबरोबर काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती, त्यानंतर तिने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने कधीही सेक्स करण्यास सहमती दिली नाही.
बेटाच्या सिव्हिल गार्ड्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, एका फ्रेंच नागरिकाला संशयित बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीचे वय 22 वर्षे आहे. याप्रकरणी बंद न्यायालयात सुनावणीही घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. अद्याप हे स्पष्ट झाले नाही की आरोपीला तुरूंगात पाठविण्यात आले की त्याचा जामीन मंजूर झाला.