पंजाब : वृत्तसंस्था – आपल्या आजोबांच्या पूण्यतिथीसाठी आलेल्या दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. यातील मारिया (वय 24) आणि नादिया रहमान (वय 17) अशी या मुलींची नावे असून त्या ब्रिटिश नागरिक आहेत. ही घटना पाकिस्तानमधील पंजाब मधील दौलत नगरची आहे. या दोन्ही बहिणींचा मृत्यू गॅस गिझर मधील वातयुगळतीमुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकाच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, मारिया आणि नादिया रहमान या दोघींचा बाथरूममधील गिझरमधून गॅस गळतीमुळे दोघींचा मृत्यू झाला. या दोघी घराच्या वरच्या मजल्यावर मृत अवस्थेत आढळून आल्या. खरंतर या दोघींचा मृत्यू १२ जानेवारी रोजी झाला होता मात्र त्यांच्या मृत्यूची बातमी आता आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकली आहे. या दोघींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे मात्र त्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.अद्याप या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
या दोन्ही बहिणींच्या पालकांनी या मुलींचा मृत्यू अपघात असल्याचे म्हण्टले असून त्यांनी मुलींच्या मृत्यूबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. तसेच पाकिस्तान मधील या मुलींच्या नातेवाईकांनी या मुलींबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे.
अपघात की घातपात ?
मारिया आणि नादियाचा मृत्यू जरी गॅस गळतीमुळे झाला असला तरी हा ऑनर किलिंग चा प्रकार असावा असे काही लोकांचे म्हणणे असल्याचे वृत्त ‘द सन’ वृत्तपत्र यांनी दिले आहे. परंतु बहिणींच्या सावत्र आईने असे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की गॅस गळतीमुळे बहिणींचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
Visit : Bahujannama.com