नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या नोएडातील यमुना द्रुतगती महामार्गावरील जेवर भागात मथुरा येथील मित्रांसमवेत जाणारी एक तरुणी संशयास्पद स्थितीत आणि जखमी अवस्थेत सापडली आहे. तिला ग्रेटर नोएडा येथील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला दिल्लीच्या जीटीबी रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे पीडितेने जगाचा निरोप घेतला. पीडित तरुणीच्या कुटूंबियांनी मित्रांवर सामूहिक बलात्कार आणि खुनाचा आरोप केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संपूर्ण देश निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी कधी होणार याची वाट पहात असताना आणखी एक निर्भया प्रकरण घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी मथूरा पोलिसांनी दोन तरूणांवर खून आणि सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नोएडा सेक्टर -73 मध्ये असलेल्या गावात ही 20 वर्षीय पीडित तरुणी कुटुंबासह राहत होती. तिचे वडील कंपनीची कार चालवतात. आई एका खासगी कंपनीत नोकरी करते. पीडित तरुणी सेक्टर-64 मधील कंपनीत काम करत होती. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी शुक्रवारी कामावर गेली. संध्याकाळी तिने रात्री उशीरा घरी परत येणार असल्याचे फोनवर सांगितले. रात्री साडेनऊ वाजता यमुना एक्स्प्रेस वेवरील जेवर येथील टप्पलजवळ अपघातात मुलगी जखमी झाल्याचा फोन तिच्यासोबत काम करणार्या मुलीला आला. तिला ग्रेटर नोएडाच्या कैलास रुग्णालयात दाखल केल्याचेही सांगण्यात आले.
रात्री 11 वाजता पीडित तरूणीचे कुटुंबीय रुग्णालयात गेले असता तरूणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला दिल्लीतील जीबीटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे चारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. वडिलांनी श्याम चौखंडी आणि सुरफाबाद येथील सचिनवर सामूहिक बलात्काराचा आणि खूनाचा आरोप केला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर श्याम आणि सचिन या दोन तरूणांवर नोएडा सेक्टर-49 पोलीस ठाण्यात खून, सामूहिक बलात्कार आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा