अलिबाग : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पेण येथे हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुरक्षित बचावले. पेणयेथील सभेसाठी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लँड झाल्यानंतर हेलिपॅडवरील माती हेलिकॉप्टरच्या चाकात रुतली. ज्यामुळे हेलिकॉप्टरवरील पायलंटचे नियंत्रण सुटले. मात्र पायलटला या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण असल्याने प्रसंगावधान दाखवत पुन्हा नियंत्रण प्राप्त करण्यात पायलटला यश आले, त्यामुळे ही दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, त्यांचे पीए, एक इंजिनिअर, एक पायलट आणि को-पायलट असे ५ जण उपस्थित होते. हे पाचहीजण सुखरूप असून, मुख्यमंत्री आपल्या पुढच्या सभेलादेखील पोहोचले असल्याची माहिती मिळली आहे. हे हेलिकॉप्टर हेलिगो चार्टर प्रा.लि.चे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्यातील कर्जत येथील आपली सभा संपवून पेण येथील प्रचार सभेसाठी रवाना झाले होते. पाऊस पडल्याने पेण येथील हेलिपॅडवर चिखल झाला होता. जवळपास साडेचारच्या आसपास पेण येथे ७ टन वजनाचे हेलिकॉप्टर लँड झाले. परंतु चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतली. त्यामुळे काही वेळासाठी पायलटचे नियंत्रण सुटले, परंतु प्रसंगावधान दाखवत लगेच नियंत्रण प्राप्त करण्यात आले. त्यामुळे अपघात टळला.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची हीं जवळपास चौथी वेळ आहे, याआधी ते अश्या अपघातांतून सुखरूप बचावले आहे. मुख्यमंत्री आणि इतर जण सुखरूप असून आपल्या पुढच्या सभेसाठी ते दाखल झाले आहेत.
Visit : bahujannama.com