बहुजननामा ऑनलाईन
बॉलिवूड मध्ये वंशवाद, गटबाजी, पक्षपात यावर नेहमीच टीका टिप्पणी होते असते. परंतु हे काय फक्त बॉलिवूड मधेच नाही तर सर्वच ठिकाणी या गोष्टी दिसून येतात. आणि अशाच गोष्टीवर अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने सुद्धा वाच्यता केली आहे.
बॉलिवूड मध्ये वंशवाद, गटबाजी, पक्षपात यावर नेहमीच टीका टिप्पणी होते असते. परंतु हे काय फक्त बॉलिवूड मधेच नाही तर सर्वच ठिकाणी या गोष्टी दिसून येतात. आणि अशाच गोष्टीवर अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने सुद्धा वाच्यता केली आहे.
ईशा म्हणते की, वंशवाद,गटबाजी ही फक्त बॉलिवूड मधेच आहे असे नाही तर ती सर्वच ठिकाणी दिसून येते. ‘अब राजा का बेटा ही राजा नही बनेगा’ असे डायलॉग फक्त सिनेमतच चांगले वाटतात.परंतु वास्तविकता खूप वेगळी आहे. वंशवाद आणि गटबाजी जरी असली तरी स्टार होण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कामा येत नाहीत तर तुम्हाला तुमचे कष्ट आणि प्रदर्शन याच गोष्टीने मोठेपणा मिळत असतो.
ईशा पुन्हा म्हणते की मला मान्य आहे वंशवाद, गटबाजी ही मोठ्याप्रमाणात बॉलिवूड मध्ये आहे परंतु कितीतरी सुपरस्टार च्या मुलांना माघारी जावे लागले आहे. आणि माझ्या सारख्या बाहेरून आलेल्या खूप लोकांनी इथे मोठ्या कष्टाने आज आपले स्थान निर्माण केले आहे. माधुरी दीक्षित, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा हे सर्व
याचेच उदाहरण आहे.
अंतर्गत गटबाजी बद्दल बोलताना ईशा म्हणते की ज्याला जो व्यक्ती आवडतो तो त्याच्यासोबत काम करतो या बद्दल मी काही बोलू शकत नाही यावर बोलणे म्हणजे तक्रार केल्याप्रमाणे होईल. तसेच कास्टिंग काऊच बद्दल सुद्धा ईशा म्हणते की कास्टिंग काऊच द्वारे काम ज्यांना करायचं ते करू शकतात ज्यांना नाही करायचा त्यांच्याकडे तो विकल्प आहे. मात्र आज च्या घडीला कितीतरी प्रसिद्ध अभिनेत्र्यांनी कास्टिंग काऊच द्वारे काम करून पुढे आल्या आहेत.
यावेळी ईशा हिला बॉलिवूड मध्ये चालू असलेल्या ड्रग च्या प्रकरणाबद्दल विचारले असता आपला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. तसेच आपणाला या गोष्टीला कधी सामोरे देखील जावे लागले नाही. परंतु या सर्व गोष्टीवर नक्कीच अंकुश लावावा असेही ती म्हणाली.