बहुजननामा ऑनलाईन – ‘कौन बनेगा करोडपती’ च्या नव्या सीझनसाठी चर्चेत असलेले अभिनेते अमिताभ बच्चन आरोग्याच्या बाबतीत खूप संघर्ष करत आहेत. नेहमी फिट आणि अॅक्टिव्ह असलेले बिग बी यांचा 75 टक्के लीव्हर खराब झाला आहे. ते आता फक्त 25 टक्के लीव्हरच्या आधारे जगत आहे. याचा खुलासा बिग बी यांनी स्वत: एका कार्यक्रमात केला.
एका टीव्ही कार्यक्रमात 76 वर्षीय अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते. येथे आरोग्याविषयी बोलताना ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने आपल्या शरीराची नियमित तपासणी ठेवली पाहिजे. ‘मला क्षयरोगाचा त्रास आहे आणि बर्याच समस्या आहेत. जर हे रोग वेळेवर माहित असतील तर त्यांचे उपचार करणे शक्य आहे.’ अमिताभ यांना बर्याच त्रासांचा सामना करावा लागला, परंतु या त्रासांचा त्यांनी स्वत: वर कधीही परिणाम होऊ दिला नाही.
अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतात. नियमित व्यायामाबरोबर ते फिरायलाही जातात. ते दिवसभर खूप सक्रिय असतात आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी सावध असतात.
आरोग्याबद्दलची त्यांना जाणीव असून ते या वयातही कामामध्ये तितकेच पुढे आहे जितके पहिले होते. सध्या टीव्हीवर ‘केबीसी’ चालू आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे म्हणले तर त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘गुलाबो सीताबो’ चे शूटिंगही सुरू आहे. ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ नावाच्या चित्रपटाचे कामही सुरू आहे. या चित्रपटाचे पोस्टरही प्रसिद्ध झाले आहे.