नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालयाने (ईडी ) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा तसेच मोजर बेयर चे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना ३५४ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडी ने हि कारवाई सीबीआय च्या अंतर्गत पुरी , त्याची कंपनी , त्यांचे वडील दीपक पुरी ,आई नीता पुरी (कमलनाथ यांची बहीण ), संजय जैन , विनीत शर्मा यांच्या विरोधात भष्टाचार , घोटाळा, कट या मुद्द्यांच्या आधारे केली आहे.
सीबीआय ने रविवारी आरोपी पुरी तसेच इतर संचालकांच्या निवास्थानी तसेच कार्यालयात छापे टाकून तपासणी केली बँके ने दिलेल्या माहितीनुसार रतुल पुरी यांनी २०१२ मध्ये कार्यकारी संचालकाच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्ये आई – वडील त्या ठिकाणी कार्यरत होते. कंपनी मध्ये कॉम्पैक्ट डिस्क, डीवीडी, सॉलिड स्टेट स्टोरेज डिवाइस सारखे उत्पादन निर्मिती केली जाते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , सीबीआय ने पुरी सोबतच अन्य संचालकांच्या विरोधातही या संदर्भात कारवाई केली आहे. एजन्सी ने कंपनीच्या कार्यलयासोबतच संचालकाच्या घरी अश्या ६ ठिकाणी छापे टाकले आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांनी शुक्रवारी अगस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणात त्यांच्याविरूद्ध जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला रद्द करण्यासाठी दिल्ली कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून जाब विचारण्यासाठी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी शनिवारी सुनावणीसाठी तारीख निश्चित केली. रतुल पुरी यांनी कोर्टाला सांगितले की, आपल्याला तपासात सामील व्हायचे आहे, म्हणून त्यांच्याविरूद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करावे. कोर्टाने यापूर्वी पुरीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. खरं तर, अंमलबजावणी संचालनालयाने कोर्टाला सांगितले होते की, पुरी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच साक्षीदारांना आपल्या बाजूला वळवू शकतात, जे कि त्यांनी आधी देखील केले आहे.