पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Blood Donation Camp In Pune | शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन (Martyr Captain Sushant Godbole Foundation) व सर परशुरामभाऊ महाविद्यालय (SP College Pune) यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी. कॉलेज) येथे ,सोमवार २० मार्च २०२३ सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे. (Blood Donation Camp In Pune)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या शिबिरात संकलित होणारे रक्त आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज (ए एफ एम सी ) ला दिले जाणार आहे.आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, स. प. जिमखाना, एनसीसी, एनएसएस चा सहभाग या शिबिरात असणार आहे. फाऊंडेशनच्या संस्थापक गीता गोडबोले यांनी ही माहिती दिली . शहीद दिना निमित्त हे शिबीर आयोजित केले जात आहे.भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे (Rajesh Pandey Bjp) हेही उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक उपक्रमातून वीरांचे स्मरण
इ.स. २००३ साली वयाच्या २३ व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ऑपरेशन पराक्रम दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले .
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम करण्यासाठी त्यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांनी ‘ शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन ‘ स्थापन केले आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह,
राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती.
त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘शहीद दिवस’ (Shahid diwas) म्हणून साजरा केला जात असतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Blood Donation Camp In Pune | Blood donation camp on March 20 by Martyr Captain Sushant Godbole Foundation
हे देखील वाचा :