बहुजननामा ऑनलाईन टीम – व्हिडीओ कॉलवर स्क्रीन शॉट घेत १२ वीच्या विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने विद्यार्थिनीच्या अस्थाव्यस्थ स्थितीतील स्क्रीनशॉट घेतला होता आणि सोशल मीडियावर अश्लील फोटो पोस्ट करण्याची धमकी दिली होती. आरोपीने विद्यार्थिनीला सांगितले होते की तिने आत्महत्या करेपर्यंत तो तिला ब्लॅकमेल करत राहील. चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.
नवी दिल्ली जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थीनी आपल्या आईबरोबर चाणक्यपुरी भागात राहते. पीडितेला वडील नसून ती एकटीच घराची संतान आहे. तर पीडितांची चुलत बहीण कोलकत्ता येथे राहते. काही महिन्यांपूर्वी पिडीताच्या चुलत बहिणीने कोलकात्यात राहणाऱ्या कबीर खानचा मोबाईल नंबर दिला होता. यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि कबीर खान दोघेही फोनवर बोलू लागले. दोघे फेसबुकवर मित्र बनले. २५ सप्टेंबर रोजी विद्यार्थिनीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कबीर खानने तिला व्हिडिओ कॉल करण्यास सुरुवात केली होती.
एके दिवशी कबीर खानने पीडित विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉल केला, यावेळी पिडीताच्या अंगावरचे कपडे अस्थाव्यस्थ होते. तेव्हाच आरोपींनी व्हिडिओ कॉलवर स्क्रीन शॉट घेतला. यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरू केले. आरोपींनी पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल केला. यावेळी आरोपीने मुलीला फेसबुकवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीला नग्न होण्यास भाग पाडले. यावेळीही त्याने स्क्रीन शॉट्स घेतले, आणि पुन्हा ब्लॅकमेल करण्यास सुरू केले. आरोपी आता विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहे. चाणक्यपुरी पोलिसांनी विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीवरून कबीर खान विरुद्ध छेडछाड आणि पॉक्सो एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी एक पथक कोलकत्ता येथे रवाना झाला आहे.
Visit : bahujannama.com