जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.1) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली. याठिकाणी त्यांनी भाजपच्या BJP खासदार रक्षा खडसे व इतर कर्यकर्त्यांची फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान खडसे कुठेही दिसून आले नाहीत. मात्र, रक्षा खडसे यांनी याबाबत वेगळी माहिती दिली आहे. खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणं झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपला BJP रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यामुळे आपल्याला पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. अशा परिस्थितीत फडणवीस यांनी थेट खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
रक्षा खडसे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना महत्त्वाची माहिती देताना म्हणाल्या, फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले नाहीत. ते यापूर्वीही घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळे नाथाभाऊंचही त्यांच्याशी बोलणं झालं, असं रक्षा खडसे यांनी सांगितलं. रक्षा खडसे पुढे म्हणाल्या, मी भाजपची खासदार असल्याने माझ्या मतदारसंघात येणाऱ्या भाजप नेत्यांना घरी चहापाण्यासाठी बोलवणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्याचे त्यांनी सांगितले. खडसेंच्या कोथळी येथील घरामध्ये असलेल्या कमळाच्या चिन्हाच्या घड्याळाबद्दल विचारले असता रक्षा खडसे यांनी सांगितले, की नाथाभाऊ आज राष्ट्रवादीमध्ये आहेत. पूर्वी ते भाजपमध्ये होते. तेव्हापासून या वस्तू घरात आहेत.
माझ्यामुळं सत्ता गेल्याचं फडणवीसांना दु:ख; संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला
देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले – ‘कोरोना संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू’
खा. इम्तियाज जलील यांचा महिला पोलिसाच्या हातावर फटका, FIR दाखल