बहुजननामा ऑनलाइन टीम – खासदार संभाजीराजे भाोसले यांनी मराठा तरुणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन केलं आहे. युवकांनी आत्महत्या करू नये असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल तर मला चांगलं वाटणार आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं बीडमधील तरुणानं आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.
संभाजीराजेंनी ट्विट करत लिहिलं आहे की, “विवेक रहाडे या युवकानं समाजासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या कुटुंबासोबत आमच्या सवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं ही कधीही भरून न निघाणारी हानी आहे. मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. समाजासाठी बलिदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रद्धांजली.”
https://twitter.com/
संभाजीराजे म्हणतात, “माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल तर मला चांगलं वाटणार आहे का ? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की, कोणीही असा पर्याय निवडू नये” असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
https://twitter.com/
“मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहिल. मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू. हा लढा सुरू असतानाच युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही.” असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.
https://twitter.com/
बीडमधील केतूरा गावातील 18 वर्षीय विवेक रहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.