बहुजननामा ऑनलाइन टीम – बनावट कागदपत्र वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची तब्बल 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबादमधील गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब (Bjp Mla Prashant Bamb) यांच्यासह 16 जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(BJP MLA Bombay) आहे. मात्र, अद्याप आ. बंब यांना अटक झाली नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून गंगापूर सहकारी साखर कारखाना बंद आहे. राज्य सरकारने या कारखान्यावरील कर्जापोटी हा कारखाना जप्त केला होता, तर संबंधित बँकेने हा कारखाना विक्रीस काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन कारवाईत गंगापूर न्यायालयात कारखान्याकडून रक्कम जमा केली होती. त्यांनतर हा विक्रीचा व्यवहार रद्द केला होता. त्यामुळे न्यायालयाकडून ही रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा झाली होती. ती आतापर्यंत व्याजासह 15 कोटी 75 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बँकेच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही, असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब व त्यांच्या काही संचालकांनी म्हटले असल्याची तक्रार कारखान्यातील सभासदांनी एकत्र येत केली आहे. तसेच, पैशांचा अपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
7 नोव्हेंबर 2020 रोजी कारखान्याला ही रक्कम परत मिळाली. कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब व प्रभारी संचालक बी. एम. पाटील यांनी संगनमत करून 20 जुलै रोजी ही रक्कम बेकायदेशीररित्या कारखान्याचे खाते उघडून व खात उघडण्यासाठीदेखील कारखान्याचा ठराव केला होता. तोदेखील बनावट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खाते उघडताना कारखान्याची भागीदारी दाखवण्यात आली. त्यामध्ये आमदार बंब व पाटील हे भागीदार असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली. नागरी सहकारी बँकेत खाते उघडताना जी परवानगी घ्यावी लागत होती, ती परवानगीदेखील घेतली नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त झालेली रक्कम विविध ठिकाणी टाकण्यात आली. कारखाना हा वित्तीय संस्था नाही, त्यामुळे ती व्याज वाटू शकत नाही, असेदेखील तक्रारीत म्हटले आहे.