बीड : बहुजननामा ऑनलाईन – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत असे समजत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांच्या या दसऱ्या मेळाव्याला विधानसभा निवडणुकीतील भाजपचे 50 उमेदवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहेत. विरोधकांना शह देण्यासाठी पंकजा मुंडे आपली ताकद दाखवणार आहेत. या निवडणुकीत बीडमधील राजकारण रंगणार असणार असल्याचे दिसणार आहे.
आगामी विधानसभा जवळ येत आहेत तसा राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. या निवडणुकीआधीच राजकीय वर्तुळात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी आपापले पक्ष बदलले. सत्ताधारी पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाली होती. अनेक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काही दोन तर काहींनी तीन याद्या जाहीर केल्या आहेत.
Visit : bahujannama.com