मुंबई बहुजननामा ऑनलाइन – भाजपच्या 125 उमेदवारींची राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठीही पहिली यादी आज अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर जाहीर करण्यात आली. दिल्लीतील भाजपच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, मुक्ता टिळक याच्यासारख्या काही मुख्य उमेदवारींची घोषणा करण्यात आली.
BJP releases first list for upcoming Maharashtra assembly elections on October 21. Maharashtra CM Devendra Fadnavis to contest from Nagpur South West, BJP Maharashtra Chief Chandrakant Patil to contest from Kothrud & Pankaja Munde to contest from Parli. pic.twitter.com/8hMxbnwxnd
— ANI (@ANI) October 1, 2019
विशेष म्हणजे पुण्यातील 8 ही मतदार संघात शिवसेनेला एकही जागा देण्यात आली नाही. हडपसर मधील जागा देखील भाजपने आपल्याकडे ठेवली आहे.
देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढतील तर पुण्याच्या कोथरुड मधून नागरिकांचा विरोधात असताना देखील चंद्रकांत पाटलांना कोथरुड मतदार संघातूनच उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. तर मुक्ता टिळक यांना देखील कसबा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना पुन्हा परळीतून संधी देण्यात आली आहे. 52 उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 12 जणांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. पहिल्या यादीतून विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे वगळण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com