बहुजननामा ऑनलाइन टीम – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याचा आज 32 वा वढदिवस आहे. सध्या विराट आयपीएलच्या 13 व्या पर्वासाठी (Indian Premier League – IPL 2020) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघोसोबत युएईमध्ये आहे. आज आपण त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहे. खास करून त्याची कमाई.
विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटनं स्वत:चा ठसा उमटवला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8, 9, 10 आणि 11 हजार धावा करण्याचा विक्रम, 28 ते 43 शतकांचा सर्वात जलद प्रवास, कर्णधार म्हणून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1, 2, 3, 4 आणि 5 हजार धावा करणारा फलंदाज आदी अनेक विक्रम विराटनं त्याच्या नावावर केले आहेत.
क्रिकेटचं मैदन गाजवणारा विराट मार्केटींग क्षेत्रातही राज्य गाजवतो आहे. फोर्ब्सनं (Forbes) जाहीर केलेल्या जगातील सर्वात महागड्या 100 खेळाडूंमध्ये एकमेव क्रिकेटपटू हा विराट कोहली आहे. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या 2020 मधील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट 66 व्या क्रमांकावर आहे. 2019 च्या तुलनेत त्यानं 30 स्थानांनी सुधारणा केली आहे.
फोर्ब्सुच्या माहितीनुसार, विराट कोहली हा वर्षाला 26 मिलियन डॉलर म्हणजेच 192 कोटी रुपये कमावतो. यापैकी 24 मिलियन डॉलर (178 कोटी) हे जाहिरातीतून कमावतो. तर उर्वरीत 2 मिलियन हे सॅलरी आणि इतर बक्षीसांमधून येतात.