नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बिल गेट्सची मुलगी जेनिफर गेट्सने तिचा प्रियकर नायल नासरशी लग्न केले असून जेनिफरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकत ही माहिती दिली आहे.जेनिफरचे वय 23 असून नाईलचे वय 28 वर्ष आहे. नाईलला एका सुंदर बर्फाळ ठिकाणी घेऊन जाऊन तिला प्रपोज केले होते. तर तिला डायमंडला रिंग देत नायलने संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवण्यास परवानगी मागितली असता जेनिफरने लगेच होकार दिला. यानंतर दोघांनी एकमेकांना किस करत मिठीही मारली.
जेनिफर बिल आणि मेलिंडा गेट्सची मोठी मुलगी असून जेनिफर आणि नायल एकमेकांना जवळजवळ 4 वर्षांपासून ओळखत होते. नायल हा मिस्त्रमधील श्रीमंत तरुणांपैकी एक आहे. जेनिफरने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत नायल नासार तू जगात तुझ्यासारखा एकच व्यक्ती आहेस. माझ्यासमोर प्रस्ताव ठेवून तू माझ्या पायाखालची जमीन हलवली आहे. मी आता संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालविण्यासाठी अजून वाट बघू शकत नाही,’ असे लिहिले आहे.
जेनिफरने पुढे इंस्टाग्रामवर लिहिले की, तिला आपले संपूर्ण जीवन नायलबरोबर विकसित करत, शिकत, हसत आणि एकमेकांवर प्रेम करत घालवायचे आहे. तसेच तिला दहा लाख वेळा नायलवर प्रेम करण्याची इच्छाही व्यक्त केली. तर नायलने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिले की, मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचे वाटत आहे. जेन, मी आजवर जे काही विचार केला आहे त्यापेक्षा तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचारही करू शकत नाही. तुझ्यासोबत राहणे म्हणजे स्वप्नात जगण्यासारखे आहे.’ इन्स्टाग्रामची छायाचित्रे पाहता असे दिसते की दोघेही स्की रिसॉर्टमध्ये आहेत. जरी दोघांनी स्थानाबद्दल कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही.