पटना वृत्तसंस्था – बिहारमधील छपरा येथे जनावर चोरी केल्याच्या संशयातून जमावाने बेदम मारहाण करत तिघांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अद्याप अटक केली नाही. तर याप्रकरणी तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
छपरा येथील बनियानपूर येथे शुक्रवारी सकाळी ग्रमास्थांनी चार जणांना जनावरं चोरल्याच्या संशयातून पकडलं. त्यांतर ग्रामस्थांनी कोणालाही माहिती न देता त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना एवढी मारहाण करण्यात आली की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चोर जनावरं चोरी करण्यासाठी एका घरात घुसले. तेव्हा त्यांना पकडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर सर्वांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. तर अद्याप कोणालाही अटक कऱण्यात आली नाही.
Bihar: Three people were beaten to death by locals in Baniyapur, Saran on suspicion of cattle theft, today morning. Bodies sent for postmortem by police, investigation underway. pic.twitter.com/wNKJIYgfn5
— ANI (@ANI) July 19, 2019