बहुजननामा ऑनलाईन टीम – Bigg Boss Marathi | सध्या बिग बॉस मराठीचे चौथे पर्व दिवसेंदिवस रोमांचक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना मनोरंजन करण्यात स्पर्धक कोठेही मागे राहताना दिसत नाहीत आणि अशातच एका मागून एक धक्के प्रेक्षकांना मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात बिग बॉसमधून तेजस्विनी लोणारी बाहेर पडताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर समृद्धी जाधव वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेले विशाल निकम आणि मीरा जगन्नाथदेखील स्पर्धेबाहेर पडले, तर त्यांच्याच बरोबर डॉक्टर रोहित शिंदेदेखील बाहेर पडला, तर या आठवड्यात पुन्हा एकदा वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या स्पर्धकाला बाहेर पडताना पाहून प्रेक्षकांनादेखील मोठा धक्का बसला आहे. (Bigg Boss Marathi)
या आठवड्यात अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, स्नेहलता वसईकर, प्रसाद जवाडे हे स्पर्धक नॉमिनेशन लिस्टमध्ये होते, तर घरातील सदस्यांच्या मते वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेली सदस्य स्नेहलता वसईकर ही काही करून घराबाहेर पडणार नाही याची गॅरंटी त्यांना होती. मात्र, या उलट झाल्याचे पाहायला मिळाले, तर या आठवड्यात बिग बॉस मराठीमधून स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) बाहेर पडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रसादबद्दल अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. शेवटी जनतेच्या कृपेने तो पुन्हा एकदा सुरक्षित झाला. अनपेक्षितपणे स्नेहलताला बाहेर पडावे लागल्याने ती खूपच भावूक झाली होती. त्याचबरोबर घरातले सगळे सदस्यही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले, तर स्नेहलता जाता जाता म्हणाली, “मी कोणाला कळत न कळत दुखावले असेल तर मला माफ करा. कारण मी समोर एक आणि मागे एक बोलत नाही. जे आहे ते समोर बोलते”. आता येणाऱ्या काळात कोण स्पर्धक घरात टिकून राहील, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. (Bigg Boss Marathi)
Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi season 4 new update actress snehlata vasaikar evicted form the house
हे देखील वाचा :
Wardha Crime | धक्कादायक! वर्ध्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह
Pune Crime | हॉटेलमध्ये राडा घालत केली गाड्यांची तोडफोड; वारजे परिसरातील घटना