पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | बेंगलोर येथे फ्लॅट घेण्यासाठी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत मारहाण करून मानसिक त्रास (Mental Distress) दिल्याने पतीने आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी पत्नीसह चार जणांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) 4 डिसेंबर रोजी घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सौरभ झा (वय 31) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभची आई श्यामल किशोर झा (वय 59, रा. लोहगाव, पुणे) यांनी रविवारी (दि.11) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सौरभ याची पत्नी, मेव्हणा, मेहुण्याची पत्नी आणि सासरे (सर्व रा. बिहार) यांच्याविरुद्ध आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मुलाला आरोपींनी पैशासाठी आणि बेंगलोर (Bangalore) येथे फ्लॅट घेण्यासाठी तगादा लावला होता.
तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून फिर्यादी
यांच्या मुलाने 4 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली होती.
फिर्यादी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Husband commits suicide out of frustration over wife and her family’s suffering; FIR against four including wife; Incidents in Mundhwa area
हे देखील वाचा :
Wardha Crime | धक्कादायक! वर्ध्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा संशयास्पद मृतदेह
Pune Crime | हॉटेलमध्ये राडा घालत केली गाड्यांची तोडफोड; वारजे परिसरातील घटना
Pune Rickshaw Strike | आज पुन्हा रिक्षाचे आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलनाची हाक