नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिग्दर्शक जॉनी बक्षी यांनी जगाला निरोप दिला आहे. होय, आता ते या जगात नाही. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री (चार सप्टेंबर) रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. जॉनी बक्षी यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. तसे, ते केवळ एक उत्तम दिग्दर्शकच नव्हते तर एक उत्तम निर्माता देखील होते. त्यांनी राजेश खन्ना आणि गुलशन ग्रोव्हर स्टारर फिल्म ‘खुदाई’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.
या व्यतिरिक्त जॉनी यांनी ‘मंजिल और भी हैं’, ‘मेरा दोस्त मेरा दुश्मन’, ‘फिर तेरी कहानी याद’ अशा बर्याच चित्रपटात निर्माता आणि सह निर्माता म्हणून काम केले आहे. जॉनी बक्षीच्या कारकीर्दीचा शेवटचा चित्रपट हिमेश रेशमियासोबत ‘कजरारे’ होता आणि त्यांचा चित्रपट सन 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हिमेश रेशमिया, सारा लॉरेन आणि अमृता सिंग यांनी काम केले आहे.
या व्यतिरिक्त जॉनी बक्षी देखील इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनचा (आयएमपीपीए) भाग होते. जॉनी बक्षी चित्रपटप्रेमी होते, म्हणूनच त्यांनी हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मार्लन ब्रँडो यांच्या प्रेरणेने आपल्या मुलाचे नाव ब्रँडो ठेवले. तसे, जॉनी बक्षी यांनी बरीच वर्षे राज खोसला यांचे सहाय्यक म्हणून काम केले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.