बहुजननामा ऑनलाईन टीम – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्ग्ज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ३१ जुलै रोजीच राष्ट्रवादी- काँग्रेसचे आमदार , कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला. आता उत्तर महाराष्ट्रातील काही मोठे नेते ८ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपमध्ये काँग्रेसमधील शिरपूर येथून माजी राज्यमंत्री अमरीश पटेल, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, अक्कलकुवाचे आमदार के.सी. पाडवी तर जळगाव मधील राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, धुळ्याचे माजी आमदार राज वर्धन कदमबांडे हे ८ तारखेला भाजपमध्ये प्रवेश घेणारा असल्याचे बोलले जात आहे.या नेत्यांनी गिरीश महाजन यांची गेल्या आठवड्यातच भेट घेतली होती. तर जयकुमार रावल हे अमरीश पटेल यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
३१ जुलै रोजीच राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा यांनीही ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश केला आहे.