भद्रावती : कोंढा फाट्यावर दुचाकीचा भीषण अपघात; १ जण जागीच ठार, तर १ गंभीर : चारचाकीने दिली धडक
December 4, 2020
बहुजननामा ऑनलाइन टीम – येथून ८ कि.मी.अंतरावर असलेल्या कोंढा फाट्यावर मांजरीकडून येणा-या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक(accident) दिल्याने १ जण जागीच ठार, तर १ जण गंभीर जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. ४ डिसेंबर) सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी येथील अब्दुल वहाब (५०) व दीपक गुप्ता (३१) हे दोन जण पॅशन मोटारसायकल (क्र.एमएच ३४,बी के १९५७) ने मांजरीवरून भद्रावतीला येत होते. दरम्यान, कोंढा फाट्यावर भद्रावतीकडे वळताच चंद्रपूरकडून नागपूरकडे भरधाव जाणा-या अज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले, तर दीपक गुप्ता हे गंभीर जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.