बंगळुरू : वृत्तसंस्था- एका 25 वर्षीय तरुणाने वडिल पबजी खेळण्यास मनाई करतात म्हणून त्यांची हत्या केली आहे. कर्नाटकातील बेलागावीमधील हा प्रकार आहे. रघुवीर कुंभार असे या तरुणाचे कथित नाव आहे. रविवारी दोघांमध्ये गेम खेळण्याला घेऊन थोडा वाद झाला. त्यानंतर रघुवीरने आपल्या वडिवलांवर हल्ला केला. त्याने वडिलांच्या शरीराचे तुकडे केले. केवळ मोबाईलवर शांततेत पबजी खेळता याव यासाठी त्याने हे केलं. शंकर असे त्याच्या वडिलांचे नाव आहे.
बेलागावी पोलिसांनी सांगितले की, “रघुवीरचा फोन हिसकावल्याने आणि वडिलांनी पबजी खेळण्यास मनाई केल्याने त्याने वडिलांवर हल्ला करत त्यांचा खून केला. त्याने घरातील इतरांना एक खोलीत बंद केले आणि वडिलांचे तुकडे तुकडे केले. सकाळी 5 वाजता घडलेली ही घटना सिद्धेश्वर नगर काकटी मधील आहे.
पबजीच्या व्यसनाने तरुण पिढीचं करिअर बरबाद
पोलिसांनी सदर तरुणाला अटक केली आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे. मृत शंकर या घटनेच्या तीन महिने अगोदरच पोलीस विभागातून रिटायर झाले होते. पबजीच्या व्यसनाने अनेक तरुण पिढ्या बरबाद होत आहेत.