बहुजननामा ऑनलाईन टीम – भाजपला विरोध करणार्या आणि टीका करणार्या पेजेसवर बंदी घालण्याची मागणी पक्षामार्फत फेसबुककडे करण्यात आली होती. अपेक्षित नियमांचे पालन या पेजेसकडून केले जात नसून पेजेसवर तथ्यहीन माहिती शेअर केली जात असल्याचा दावाही भाजपाने केला होता. भाजपाने दिलेल्या यादीपैकी 14 पेजेस सध्या फेसबुकवर नसल्याचे सांगण्यात आले आहे .
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपने फेसबुक इंडियाकडे आधी दिलेल्या यादीमधील 17 पेजेस पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी केली. त्याचबरोबर दोन न्यूज वेबसाईटला मॉनेटाइज करण्याची मागणीही भाजपाने केली. या दोन न्यूज वेबसाईटमध्ये चौपाल आणि ओपइंडिया या दोन वेबसाईटचा समावेश आहे. हा दोन्ही वेबसाईट भाजपाचे समर्थन करणारा मजकूर पोस्ट करण्यासाठी आणि उजव्या विचारसरणीच्या वेबसाईट म्हणून प्रसिद्ध आहेत. भाजपाच्या मागणीनंतर फेसबुकने 17 पेजेस पुन्हा सुरु केली. फेसबुकने भाजपाला दिलेल्या माहितीमध्ये ही पेजेस चुकून हटवण्यात आली होती. यासंदर्भात भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय आणि फेसबुक इंडियामध्ये इमेलवरुन चर्चा झाली होती.