बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे. मग तो बिझनेस असो, वाहतूक असो, रोजगार किंवा अजून काही. कोरोना संक्रमाणाच्या भीतीने लोकांनी नोटांनाही सॅनिटाईज केलं. त्यामुळे सॅनिटाईज करणे, धुवणे किंवा उन्हात सुकवल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नोटा खराब झाल्या. याच कारणामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहचणाऱ्या खराब नोटांच्या संख्येने आत्तापर्यंतचा रेकॉर्ड मोडला आहे. सर्वात जास्त 2000 रुपयांच्या नोटा खराब झाल्या आहेत. आरबीआय कडे यावेळी 2000 रुपयांच्या 17 कोटींपेक्षा अधिक खराब नोटा आल्या आहेत. त्यासोबत 200 रुपये, 500 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या देखील अनेक नोटा खराब झाल्या आहेत.
आरबीआयच्या रिपोर्टनुसार, या वर्षी 2000 रुपयांच्या 17 कोटींपेक्षा अधिक खराब नोटा खराब झाल्या. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत 300 पट अधिक आहे. कोरोना संक्रमण सुरु झाल्यापासून लोकांनी नोटांना सॅनिटाईज करणे, धुवणे किंवा उन्हात सुकवायला सुरुवात केली. बँकांमध्येही नोटांना सॅनिटाईज केले जाते. परिणामी जुन्या तर सोडाच पण नवीन नोटा देखील एका वर्षाच्या आत खराब झाल्या.
कोरोनाचा नोटांवर झाला असा परिणाम
मागील वर्षी 2000 रुपयांच्या 6 लाख खराब नोटा आल्या होत्या, या वर्षी तो आकडा 17 कोटींपेक्षा अधिक आहे. 500 रुपयांच्या दहा पट नवीन नोटा खराब झाल्या आहेत. 200 रुपयांच्या तर मागील वर्षीच्या तुलनेत 300 पटपेक्षा अधिक नोटा खराब झाल्या आहेत. 20 रुपयांच्या एका वर्षात 20 पट अधिक नोटा खराब झाल्या आहेत.
जाणून घ्या, कोणत्या वर्षी किती नोटा खराब झाल्या-
2017-18 या वर्षाचा विचार केला तर त्या वर्षी आरबीआयकडे 2000 रुपयांच्या 1 लाख नोटा आल्या होत्या. तर 2018-19 या वर्षात ही संख्या 6 लाख इतकी झाली. मात्र यावर्षी तर या संख्येने रेकॉर्डच मोडला आहे, या वर्षी म्हणजे 2020-21 या सालात 2000 रुपयांच्या तब्बल 17.68 कोटी इतक्या खराब नोटा आरबीआय कडे पोहचल्या आहेत. अशाच प्रकारे 500 रुपयांच्या नोटांचा विचार केला तर, 2017-18 या वर्षात 1 लाख, 2018-19 या वर्षात 1.54 कोटी आणि 2020-21 मध्ये 16.45 कोटी इतक्या खराब नोटा आरबीआय कडे पोहचल्या आहेत.दरवर्षी आरबीआय कडे 10, 20 आणि 50 रुपयांच्या खराब नोटा येतात.
आरबीआयने काढलेल्या 2019-20 च्या वार्षिक रिपोर्टनुसार, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा वापर वाढत आहे. 2018 मध्ये 37,053 कोटी रुपये मूल्याच्या 18526 लाख पीस 200 रुपयांच्या नोटा सर्क्युलेशन मध्ये होत्या. 2019 मध्ये 80010 कोटी रुपये मूल्याच्या 40005 लाख पीस 200 रुपयांच्या नोटा सर्क्युलेशन मध्ये होत्या ज्या मार्च 2020 पर्यंत 1,07,293 कोटी रुपये मूल्याच्या 53,646 लाख पीस 200 रुपयांच्या नोटा सर्क्युलेशन मध्ये होत्या.