मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सध्या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे जर काही आवश्यक काम असतील तर लवकर करावी लागणार आहेत. बँका दर महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. यावेळी 26 डिसेंबर रोजी चौथा शनिवार तर, रविवारी आठवड्याची सुट्टी असणार आहे. शुक्रवारी ख्रिसमस असल्याने सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत.
31 डिसेंबर रोजी आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख असून जर बँकेकडून काही महत्वाचे कागदपत्रं, स्टेटमेंट हवे असल्यास 28 ते 30 डिसेंबर असाच वेळ असणार आहे. यामुळे तेव्हा गर्दी होण्याची किंवा बँकेवर कामाचा ताण असल्याने वेळ लागणार असल्याची शक्यता आहे. बँकेकडून आयकर भरण्यासाठी अकाऊंट स्टेटमेंट, व्याजातून उत्पन्नाचे सर्टिफिकीट, फॉर्म 26 एएस सारखे काही कागदपत्रं लागतात.
महाराष्ट्र राज्यात ख्रिसमस काळात आणि कोरोना विषाणूच्या नव्या रुपामुळे रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. सरकारने निर्णय घेतला असला तरीही सावध राहणे गरजेचे आहे. नव्या वर्षाचे स्वागत बाहेर जाऊन करता येणार नाही. तरीही नववर्षाच्या स्वागताची तयारी अनेकांकडून करता येणार आहे. यामुळे बँकेतही कामे उरकण्यासाठी लोकांची गर्दी होणार असल्याची शक्यता आहे.