मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- मोदी सरकारने मागली वर्षी म्हणजेच 1 सप्टेंबर 2018 रोजी पोस्ट पेमेंट बँक लाँच करत जनतेला खास गिफ्ट दिलं होतं. यात तुम्ही पोस्ट ऑफिसात 3 प्रकारे बचत खातं उघडू शकता. या तीनही खात्यात कमी बॅलंसची कोणतीही अट नाही. यात तुम्हाला 5.5 टक्के व्याज मिळते जे सरकारी बँकेच्या तुलनेत जास्त आहे. यात दोन प्रकारीचे बेसिक डिपॉझिट अकाऊंट आणि एक नियमित सेव्हींग अकाऊंट आहे. या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
1) सफल खातं- जर तुमचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर केवळ 100 रुपये जमा करत तुम्ही खातं उघडू शकता. यात तुम्ही 1 लाखांहून अधिक बॅलंस ठेवू शकत नाही. यात तुम्हाला फ्रीमध्ये डेबिट कार्डही मिळतं.
2) सुगम खातं- यात तुम्हाला कमीत कमी बॅलंस ठेवण्याची कोणतीही अट नाही. शिवाय तुम्ही 10 वर्षापासून हे खातं उघडू शकता. यात तुम्हाला फ्री डेबिट कार्डसह नॉमिनेशन फॅसिलिटी मिळते. यात तुम्ही 1 लाखांपर्यंतच पैसे ठेवू शकता.
3) सरल खातं- यात तु्म्हाला केवायसी डिटेल्स द्यावे लागतात. यातही तुम्ही 10 वर्षांपासून खाते उघडू शकता. यात तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाहीत. यात कमीत कमी बॅलंसची कोणतीही अट नाही. तुम्हाला नॉमिनेशन फॅसिलिटी आणि फ्री डेबिट कार्ड मिळतं.
घरपोच सेवा
या तीनही खात्यांची सेवा घरपोचही मिळते. यासाठी तुम्हाला 15 ते 35 रुपये अदा करावे लागतात.
अनलिमिटेड एटीएम ट्रॅंक्जॅक्शन
इंडिया पोस्ट एटीएमद्वारे तुम्हाला मोफत व्यवहार करणे शक्य आहे. इतकेच नाही तर नॉन मेट्रो शहरांसाठी तुम्ही इतर बँकांच्या एटीएममध्ये 5 फ्री ट्रॅंजॅक्शन करू शकता तर मेट्रो शहरात 3 ट्रॅंजॅक्शन फ्री करू शकता.