मुंबई बहुजननामा ऑनलाईन : भारतीय नौदलात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नेव्हल डाॅकयार्डमध्ये तब्बल ९३३ जागांवर मेगा भरती केली जाणार आहे. यासाठी वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे. दरम्यान उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९९ ते ३१ मार्च २००६ या दरम्यान झालेला असावा.
यासाठी उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असून कमीत कमी ५० टक्के मार्क असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ट्रेडमध्ये १ किंवा २ वर्षांचं आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा, इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्टद्वारे होईल. अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुक्ल नाही.
ऑनलाईन अर्जासाठी http://www.bhartiseva.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
यासाठी पद आणि पदांची संख्या खालीलप्रमाणे :
मेकॅनिक रेफ्रिजरेटरअँड एअर कंडिशनिंग, पद- ३९
वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक), पद- ६५
शीट मेटल वर्कर,पद- ८
पाॅवर इलेक्ट्रिशियन, पद- १९८
फिटर, पद- १४१
मशीनिस्ट, पद- ६०
टेलर (जी), पद- १३
मेकॅनिक मशीन टुल्स लिमिटेड, पद- ५९
मेकॅनिक डिझेल, पद- ७३
शिपराइट (वुड), पद- ६३
पेंटर (जनरल), पद- ३४
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, पद- २४
इलेक्ट्रोप्लेटर, पद- ०६
फाउंड्रीमॅन, पद- ०७
पाइप फिटर, पद- ५६
पॅटर्न मेकर, पद- ०९
फोर्जर अँड हिट ट्रीटर, पद- ३
शिपराइट (स्टील), पद- ३४
रिगर, पद- ४१