मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने 19 नोव्हेंबर रोजी संप (Bank Strike) पुकारला आहे. त्यामुळे
19 नोव्हेंबर रोजी बँकांची कामे बंद (Bank Strike) असण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाकडून याबाबत नोटीस
जारी करण्यात आली आहे. या संपात कोणत्या बँका सहभागी असतील याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कामगार संघटना, मानवी हक्क, रोजगार आणि नोकरीच्या शाश्वतीवर सातत्याने झालेल्या हल्ल्यांच्या विरोधात, द्विपक्षीय समझोता आणि आयडी कायद्याच्या उल्लंघनामुळे, कामगारांची बदली करून त्यांना दिला जाणारा त्रास, आणि सीएसबी बँकेने (CSB Bank) नाकारलेल्या वेतन सुधारणे विरोधात हा बंद पुकारला. द्विपक्षीय समझोत्याचा सम्मान केला जावा या मागणीसाठी हा बंद पुकारला आहे.
या बंदच्या काळात बँक बंद असल्या तरी ऑनलाईन सेवा बऱ्यापैकी सुरु असतील.
या संपाचा परिणाम त्यांच्या ग्राहकांवर होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Web Title :- Bank Strike | bank strike on 19 november how will impact on service and you also
हे देखील वाचा :
Nana Patole | ‘राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात परिवर्तनाची लाट’ – नाना पटोले
Narayan Rane | न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा