बहुजननामा ऑनलाइन – सरकारी नोकरी हे जवळ जवळ सर्वांचे स्वप्न असते. आता आता हे स्वप्न असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. शासकीय बँकेत सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या ही आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस डिपार्टमेंटमध्ये मॅनेजरच्या ५११ जागांवर कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिध्द केली आहे.
प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, ज्येष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, प्रॉडक्ट (इन्व्हेस्टमेंट एंड रिसर्च), हेड (ऑपरेशन्स अँड टेक्नॉलॉजी), डिजिटल सेल्स मॅनेजर आणि आयटी फंक्शनल अॅनालिस्ट-मॅनेजर या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर bankofbaroda.in ऑनलाइन अर्ज भरू शकतात. आज ९ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २९ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा आहे.
असा भरा अर्ज..
अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर bankofbaroda.in भेट द्या. यानंतर, करिअर विभागाच्या साइटवर जा. जिथे संबंधित भरती जाहिरातीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्या दुव्यावर क्लिक करुन उमेदवार आपला अर्ज भरु शकतात. या साइटवर मागितलेला सर्व तपशील भरून विविध कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी अपलोड करू शकता. यानंतर, उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाने निश्चित केलेली ६०० रुपये अर्ज फी भरावी लागेल. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यास सोयीस्कर ठरणार आहे. मात्र भरतीसाठी एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना केवळ १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
विविध पदांनुसार रिक्त पदांची संख्या..
वरिष्ठ रिलेशनशिप व्यवस्थापक – ४०७ पोस्ट
ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर -५० पोस्ट
टेरिटरी हेड – ४४ पोस्ट
गट प्रमुख – ०६ पोस्ट
उत्पादन प्रमुख (गुंतवणूक आणि संशोधन) – १ पोस्ट
प्रमुख (ऑपरेशन्स आणि तंत्रज्ञान) – १ पोस्ट
डिजिटल सेल्स मॅनेजर – १ पोस्ट
आयटी कार्यात्मक विश्लेषक-व्यवस्थापक – १ पोस्ट