बहुजननामा ऑनलाईन – दुबईमध्ये भारताच्या शामिया आरजूशी पाकिस्तानचा जलद गोलंदाज हसनी अलीनं विवाह केला . मूळची हरियाणात राहणारी शामिया ही गेल्या तीन वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. अलीकडेच हे दोघे विवाहबंधनात अडकले. आता अलीनंतर आणखी एक मोठा क्रिकेटपटू भारतीय तरुणीशी विवाह बंधनात अडकणार आहे. हा क्रिकेटपटू कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आहे.
विनी रमन या भारतीय वंशाच्या महिलेच्या प्रेमात ग्लेन मॅक्सवेल आहे. हे दोघेही गेली काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. सोशल मीडियावर विनी रमन आणि मॅक्सवेल यांचे फोटो वायरल होत असतात. अलीकडेच मॅक्सवेलने विनीसोबतचा फोटो स्वतः शेअर केला आहे.
विनी आणि मॅक्सवेल हे कधी लग्न करणार याबाबत नक्की माहिती जरी मिळाली नसली तरी, मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार हे मात्र दिसत आहे.