Aurangabad Crime News | गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Aurangabad Crime News | accident on paithan pachod road of aurangabad two people died on the spot

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन Aurangabad Crime News | राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पैठण जवळील पाचोड फाटा येथे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास असाच एक भीषण अपघात झाला. यामध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या कारने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात (Aurangabad Crime News) एवढा भीषण होता कि यामध्ये बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश काळूजी गवळी (वय 55, ह.मु. राजनगर मुकुंदवाडी, औरंगाबाद) आणि स्मसुदिन अन्सारी (वय 30, रा. मनिरमिंया पुरूहरा, हजारीबाग, झारखंड) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
एम.एच.20 बि.एन.9114 या क्रमांकाची कार पैठणहून पाचोडच्या दिशेने चालली होती. तर दुसरीकडे दुचाकीवरून स्मसुदिन आणि प्रकाश हे दोघेही पाचोड फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येत होते. यादरम्यान दोन्ही समोरासमोर आल्याने दोघांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये बाइकवरील दोघेजण बाइकसह दूरवर फेकले गेले. यानंतर कारचालक हा घटनास्थळावरून फरार झाला. (Aurangabad Crime News)

 

या अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दोघेही निपचित पडले होते. या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,
उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हाळ, जमादार गोपाळ पाटील, महेश माळी,
भगवान धांडे, मुकुंद नाईक हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने पैठण येथील
शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Aurangabad Crime News | accident on paithan pachod road of aurangabad two people died on the spot

 

हे देखील वाचा :

Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Pune Crime News | परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावावर गुन्हा दाखल; शिक्षक म्हणून नोकरीचे आमिष दाखवून ४५ जणांची केली कोट्यांवधीची फसवणूक

Pune Kasba Peth Bypoll Election | रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद