Pune Crime News | परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावावर गुन्हा दाखल; शिक्षक म्हणून नोकरीचे आमिष दाखवून ४५ जणांची केली कोट्यांवधीची फसवणूक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शिक्षण विभागात (Education Department) प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ४५ जणांची लाखो रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी शैलेजा दराडे (Shaileja Darade) यांच्यावर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात तब्बल साडेचार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक (Fraud Case) झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शैलेजा दराडे या परीक्षा परिषदेच्या आयुक्त (Commissioner of Examination Council) आहेत. आपल्या भावाने आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन ही फसवणूक केल्याचा शैलजा दराडे यांनी दावा केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका ५० वर्षाच्या शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे Dadasaheb Ramchandra Darade (रा. अकोले, ता. इंदापूर) आणि शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण) अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा उत्तम खाडे Shaileja Uttam Khade (पूर्वाश्रमीच्या शैलजा रामचंद्र दराडे) आणि दादासाहेब दराडे हे भाऊ बहीण आहेत. दादासाहेब दराडे याने शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या २ वहिनींना शिक्षक (Teacher) या पदावर नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी १२ लाख व १५ लाख रुपये असे २७ लाख रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे इतर ४४ जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. (Pune Crime News)
याबाबत शैलजा दराडे यांना आपल्या भावाचा हा उद्योग समजल्यावर त्यांनी वर्षभराने आपला भावाशी काहीही संबंध
नाही. दादासाहेब दराडे हा सखा भाऊ असल्याचा गैरफायदा घेऊन लोकांना कामे करुन देण्याबाबत सांगत आहेत.
शैलजा खाडे यांनी त्याच्याशी संबंध तोडलले आहे.
त्यामुळे दादासाहेब दराडे भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करु नये,
अशी जाहीर नोटीस ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले
(Assistant Police Inspector Thorbole) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A case was registered against the brother along with the Commissioner of Examination Council, Shailaja Darade; 45 people were cheated out of crores by pretending to be a teacher
हे देखील वाचा :
Comments are closed.