बहुजननामा ऑनलाइन टीम – शिरुर तालुक्यातील शिरुर शहरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आयसीआसी बॕकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांला बॕकेतील मॕनेजर तसेच बॕकेतील इतर काही सहकाऱ्यांकडून चुकी नसताना देखील बदनामी करत असल्याचे त्या महिलेस हे सहन न झाल्याने महिलेने घरी गळफास घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.याबाबत सदर महिलेने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार.शिरुर मधील आयसीआसी बॕकेत काम करणाऱ्या फिर्यादी महिला कर्मचाऱ्यांला बॕकेतील मॕनेजर अतुल शिक्की,डेप्युटी मॕनेजर पुश्कराज इनामदार,शेती डिर्पाअमेंटचे रामेश्वर दामवले हे फिर्यादी महिलेची चुकी नसताना देखील बदनामी करत असल्याने फिर्यादी महिलेस हे सहन न झाल्याने स्वताच्या घरातील फॕनला काॕटन दोरीचा साह्याने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याच वेळी मधून दोरी तुटल्याने फिर्यादी महिला खाली पडून बेशुद्ध झाली.काही वेळात तिचे पती घरी आल्यावर त्यांनी तिला बेशुद्ध पडल्याचे पाहिले व गळ्याला असलेली दोरी सोडली व मिञाच्या मदतीने खाजगी हाॕस्पिटल मध्ये दाखल केले.तेथे फिर्यादी महिला उपचार घेत आहे.
या घडलेल्या प्रकारानुसार सदर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, बॕक मॕनेजर अतुल शिक्की,डेप्युटी मॕनेजर पुश्कराज इनामदार,शेती डिर्पाअमेंटचे रामेश्वर दामवले यांच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशन मध्ये
३०६ ,५११,५०९,५०४,५०६ या कलमाअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक काबुगडे हे करत आहेत.