बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. कल्पेश मराठे असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मारहाण झालेला हा कार्यकर्ता मावळमधील सुनील शेळके यांचा जवळचा सहकारी आहे. तळेगाव दाभाडे येथील वराळे गावात ही घटना घडली. सध्याचे आमदार, राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचा दावा शेळके यांनी केला आहे.
मराठे यांना झालेल्या मारहाणीत त्यांचे दोन्ही पाय, एक हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांनी मारहाण केली त्या लोकांमध्ये बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. पण भेगडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे भाजप मधील दोन गट आमनेसामने आल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान शेळके यांनी अशी दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर निवडणूक लोकशाही मार्गाने लढायची असे असेही त्यांनी यावेळी नमुद केले. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी काही तरुणांमधील वैयक्तिक भांडणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे म्हटले आहे. तसेच, रस्त्यावरील पाणी अंगावर उडल्याने हा वाद विकोपाल गेला आहे. मात्र याला कोणीही राजकीय वळण न देण्याचे आणि या घटनेला राजकीय भांडवल करून, वातावरण कलुशित न करण्याचे आवाहन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी