मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Attack On BJP Leader In Mumbai | भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला (Attack On BJP Leader In Mumbai) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भर रस्त्यात कार थांबवून धारदार शस्त्राने वार करत दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान (Sultana Sameer Khan) यांच्यावर काल रात्री मुंबईच्या भाईंदरमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BJP pradesh mahila Minority cell – sultana khan was attacked by few unidentified at Mira Road just now.
She is admitted at Indra Gandhi hospital Mira Road.
Demand for strict action @DGPMaharashtra @BJPMahilaMorcha @bjpmaharashtra3 @BJP4Maharashtra◽️Source local news reporter. pic.twitter.com/RytQoZqHwo
— Dhiraj Mishra (@DhirajRMishra21) July 17, 2022
याबाबत अधिक माहिती अशी की, नया नगर पोलीस ठाण्याच्या (Naya Nagar Police Station) अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना समीर खान या आपल्या कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्यात कारच्या खिडकीच्या काचा फुटल्याने त्या जखमी झाल्या आहेत. हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात (Indira Gandhi Hospital) नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Attack On BJP Leader In Mumbai)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुलताना खान यांच्या पतीने सांगितले की, रात्री 11.15 च्या सुमारास ते पत्नीसह डॉक्टरांना भेटायला जात
असताना मीरा रोड परिसरात 2 दुचाकीस्वारांनी येऊन त्यांची दुचाकी कारसमोर उभी केली.
त्यांनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार केले. दरम्यान, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात
खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत.
Web Title :- Attack On BJP Leader In Mumbai | bjp leader sultana khan attacked by unknown person in mumbai crime news
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर