कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. पक्ष नेते , कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे, मात्र कोल्हापुरात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे, कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक हे युतीधर्म न पाळता उघड -उघड काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे, काँग्रेसने दक्षिण कोल्हापुरात ऋतुराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपने अमल महाडिक यांना या मतदार संघात उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र,युतीचा प्रचार न करता मंडलिक काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओदखील वायरल झाला आहे. ‘ लोकसभेच्या वेळी अमल महाडिक कधीही प्रचारासाठी आले नाहीत, त्यामुळे आता आम्हाला देखील ती संधी मिळाली आहे.’ असेही मंडलिक म्हणताना दिसले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विरोध केला होता, याचीच परतफेड आता संजय मंडलिक करताना दिसत आहेत. मंडलिक घरोघरी जाऊन ऋतुराज पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत.जेव्हा सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्या उमेदवाराची पदाची घोषणा केली , त्यावेळी मंडलिक यांनी ऋतुराज यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होत. त्यामुळे ते आता घरोघरी जाऊन ऋतुराज पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत. मी उपकारांची परत फेड करत असल्याचे मंडलिक यांनी सांगितली.
विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्यात शिवसेना ८ तर भाजप २ जागांवर निवडणूक लढवत आहे, परंतु संजय मंडलिक यांचे हे पाऊल इतर जागांसाठी देखील संकट उभे करू शकते. अशी शक्यता वर्तविली जात आहे. मंडलिक यांच्या या भूमिकेवर चंद्रकांत पाटील यांनी नाराजगी व्यक्त करत , ‘ आम्हाला शिकविण्यापेक्षा युतीधर्म पाळा, अन्यथा भारतीय पक्षाकडे कामे घेऊन येऊ नका.’ असा इशारा त्यांनी लगावला आहे.
Visit : bahujannama.com