बीजिंग : वृत्तसंस्था – चिनच्या बीजिंग शहरातून कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला असून सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना आणि जनजिवन पुन्हा सुरळीत सुरु झाले असतानाच कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार सध्या चिनवर आहे. राजधानी बीजिंगमध्ये एकाचवेळी अनेक कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने बीजिंगमधील एका जिल्ह्यात ‘वॉरटाइम’ घोषित केले आहे. एवढेच नाही तर बीजिंगमधील 11 निवासी भागात लॉकडाऊन देखील लागू केले आहे.
वास्तविक, शनिवारी सकाळी बीजिंगच्या फेटाई जिल्ह्यात कोरोनाची पाच नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर या जिल्ह्यात वॉरटाईम जाहीर करण्यात आले. मात्र, ही पाच प्रकरणे या ठिकाणचे चिंतेचे कारण नाही. खरं तर येथील चिंफाडी मांस मार्केटमध्ये एकाच वेळी अनेक कोरोनाची प्रकरणे आढळून आली आहेत. मांस बाजारातील 517 जणांचे नमुने घेण्यात आले होत. त्यापैकी 45 पॉझिटिव्ह सापडले आहेत.
शनिवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण बीजिंगमधील अकरा निवासी परिसरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कारण निवासी परिसराच्या जवळच कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शिफाडी मीट मार्केटमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे आढळून आल्यानंतर त्या जवळ असलेल्या 3 शाळा आणि 6 प्ले शाळा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.