मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भोकर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी अखेर गुलाल उधळला काँग्रेसने आपला नांदेडचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले आहे. भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी बाजी मारत भाजपला धक्का दिला आहे. अशोक चव्हाण पहिल्यापासूनच आघाडीवर होते. अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे बापूसाहेब गोरठेकर होते. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देऊन अशोक चव्हाण यांच्याविरोधात मोठे आव्हान उभे केले होते. परंतू अशोक चव्हाणांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भोकर मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर अशोक चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. त्यांना १०००० मतं मिळाली असून बापूसाहेब गोरठेकर यांच्या पारड्यात ३५०० मतं पडली होती. त्यानंतर अशोक चव्हाण १० फेरीत २२ हजार मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे बापूसाहेब गोरठेकर यांच्यासमोर मोठे आव्हान होते. ही लीड पार करणे कठीण होते.अखेर भाजपला धक्का बसला आणि काँग्रेसने आपला गुलाल उधळला.
Visit : bahujannama.com